Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाबळेश्‍वर-केळघर घाटात दरड कोसळली
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: re2
5मेढा, दि. 16 : पंढरपूर-पोलादपूर राज्य मार्गावरील केळघर ते महाबळेश्‍वर दरम्यान काळ्याकड्यापासून जवळच्या वळणावर रविवारी दुपारी 4 वाजता दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते.
रस्त्यावर आलेले मोठे दगड हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कुमक मागवून तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय यंत्रणा घटनास्थळी रवाना केली असून खबरदारीचा उपाय म्हणून मेढा व महाबळेश्‍वर येथून पाचगणी मार्गे वाहतूक सुरू केली आहे. रात्री उशिराने वाहतूक पूर्ववत होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी दिली. या घाटात पंधरा दिवसात दोन वेळा दरड कोसळली असल्याने  या मार्गावरील प्रवासी जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड कोसळणार्‍या ठिकाणांची पाहाणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: