Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणात 25 हजार क्युसेक्स पाण्याची आवक
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: re1

45.44 टीएमसी पाणीसाठा; नवजा येथे 130 मिमी पाऊस
5पाटण, दि. 16 : पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून शिवसागर जलाशयात 25 हजार 902 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 2.31 टीएमसीने वाढ झाली आहे. तर सध्याचा पाणीसाठा 45.44 टीएमसी एवढा झालेला आहे. चोवीस तासात नवजा येथे सर्वाधिक 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठ्याची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू असून असाच पाऊस बरसत राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागणार नाही. पाटणसह परिसरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहे.  
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 127 (1855), नवजा 130 (2089), महाबळेश्‍वर 112 (1815) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणातील पाणीपातळी 2102 फूट व 640.690 मीटर इतकी झाली आहे. शिवसागर जलाशयात 25 हजार 902 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत असून कोयना धरणात 45.44 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला कोयना धरणात 49.16 टीएमसी इतका पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी केवळ 3.72 टीएमसी कमी पाणीसाठा आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यक्षेत्रातही पावसाने जोर धरला असून   प्रतापगड 36 (1712), सोनाट 31 (1477), वळवण 26 (2366), बामणोली 23 (1139) व काठी 34 (1372) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटण विभागातील तारळे, चाफळ, मल्हारपेठ, मरळी, ढेबेवाडी, तळमावले, कुठरे, मोरगिरी व म्हावशी परिसरातही पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरत गारठ्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील साखरी-चिटेघर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाणी वाहू लागल्याने केरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरगिरी विभागातील मोरणा गुरेघर धरणाच्या सांडव्यातून 954 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे. तर तारळी, उत्तरमांड, महिंद, मराठवाडी या धरणातही मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
कोयना नदी पाणीपातळीत झपाट्याने वाढ
मल्हारपेठ : गेल्या दोन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ओढे, नाले, नद्या तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. तर कोयना नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून निसरे जुन्या पुलाला पाणी घासून चालले आहे. पाटण तालुका हा अतिपावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र मोसमी पावसाने उशिरा सुरूवात केल्याने पाणीसाठ्याकरिता प्रतीक्षा करावी लागली होती. उशिरा का होईना गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि लांबलेली प्रतीक्षा थांबली. पेरणी पूर्ण झालेल्या व कोळपणी सुरू असलेल्या शिवारात हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. पाटणच्या पश्‍चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने डोंगर उतारावरून पाणी वाहू
लागले आणि नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. असाच
पाऊस पडत राहिल्यास कोयना धरणात पूर्ण क्षमतेन
ेपाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. सध्या कोयना नदीला पूर आल्याने निसरे बंधार्‍यालगत पाणी चालले असून ते पाहण्यासाठी गर्दी वाढू
लागली आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: