Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड येथे दिवसा घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास
ऐक्य समूह
Saturday, July 15, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि.14 : येथील मंगळवार पेठेत वास्तव्यास असलेल्या ओंकार आपटे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून चोरट्यांनी सहा तोळ्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. याघटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की येथील मंगळवार पेठेत ओमकार आपटे हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ओमकार आपटे यांचे सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल परिसरात हॉटेल असल्याने ते दिवसभर  त्या ठिकाणी असतात. शुक्रवारी ते नेहमी-प्रमाणे हॉटेलमध्ये गेले होते तर कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरातील सर्व मुले शाळेत गेल्याने कुटुंबीयांनी बाहेर जाताना घराच्या दरवाजाला कडी-कुलूप घातले होते. दुपारी सर्व कुटुंबीय बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी कडी-कोयंडा कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला व घरातील  कपाटामध्ये असलेले साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील सहा तोळे दागिने व चाळीस हजाराची रोकड लंपास केली. काही वेळानंतर आपटे कुटुंबीय घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटल्याचे दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आल्याने पोलीसही घटनास्थळावर आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: