Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्टेट बँकेच्या एनईएफटी शुल्कात कपात
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:45 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 13 (वृत्तसंस्था) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) यावरील शुल्कात तब्बल 75 टक्के कपात केली आहे. हा बदल 15 जुलैपासून लागू होणार आहे.
एनईएफटी व आरटीजीएस हे दोन्ही व्यवहार इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून होतात. या दोन्ही पद्धतींमुळे देशातील दोन वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण होते.
या आधी स्टेट बँकेकडून दहा हजार रुपयांपर्यंतच्या एनईएफटी व्यवहारांसाठी दोन रुपये शुल्क आकारले जात होते. आता ते एक रुपया होणार आहे.     
त्यावर 18 टक्के ‘जीएसटी’ वेगळा आकारला जाणार आहे. दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या एनईएफटी व्यवहारांसाठी असलेले शुल्क चार रुपयांवरून दोन रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर आरटीजीएसद्वारे होणार्‍या दोन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या आधी हे शुल्क 20 रुपये होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: