Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिक्षिकेच्या गळ्यातील दागिने हिसकावले
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: re2
कराड येथे चोरट्यांची धूमस्टाईल
5कराड, दि. 13 : येथील सोमवार पेठेतील हाटकेश्‍वर मंदिर परिसरात दुचाकीवरून आलेल्या युवकांनी रस्त्याने चालत निघालेल्या युगंधरा दत्ताराम कदम (रा. मंगळवार पेठ, ता. कराड) या शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.20 च्या सुमारास घडली. या प्रकरणी कदम यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युगंधरा कदम या पालकर शाळेच्या शिक्षिका आहेत. त्या गुरुवारी सकाळी आपल्या मैत्रिणीबरोबर शाळेकडे निघाल्या असता सोमवार पेठेतील हाटकेश्‍वर मंदिराजवळ काळ्या रंगाच्या होंडा मोटरसायकलवरून दोन जण आले. त्यावर मागे बसलेल्या युवकाने कदम यांच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर चोरट्यांनी मोटरसायकलवरून धूम ठोकली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: