Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दागिने लांबवणार्‍या तोतया पोलिसास अटक
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: re1
तीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
5कराड, दि. 13 : कराड शहरासह विविध ठिकाणी पोलीस असल्याची बतावणी करत हातचलाखीने ज्येष्ठ नागरिक व महिलांचे दागिने लुबाडणारा सराईत गुन्हेगार जफर शहाजमान इराणी (वय 38, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) याला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीचे 10 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
पुढे पोलीस तपासणी सुरू आहे. तुमचे दागिने व मौल्यवान वस्तू रुमालात बांधून खिशात ठेवा, असे सांगून इराणी हा ज्येष्ठांना व महिलांना फसवत होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोयना वसाहतीतील पाच मंदिर परिसर, ढेबेवाडी फाट्यानजीक कॉस्मेटिक कंपनीजवळ आणि विद्यानगर येथील शेवंता कॉलनीजवळ नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या दरम्यान ज्येष्ठ नागरिक व महिलांचे दागिने लांबवल्याच्या घटना घडल्या होत्या. जफर इराणी हा ज्येष्ठ नागरिक व महिलांना आपण पोलीस असल्याचे सांगत असे. पुढे पोलीस तपासणी सुरू आहे. तुमचे दागिने व मौल्यवान वस्तू रुमालात बांधून खिशात ठेवा, असे सांगून तो हातचलाखी करून दागिने लुबाडत होता. या प्रकरणी त्याला पुणे येथे अटक करण्यात आली. त्याच्याकडून सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या असा एकूण 3 लाख रुपये किमतीचा 10 तोळ्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, हवालदार सतीश जाधव, प्रदीप कदम, पोलीस नाईक नितीन येळवे, देवा खाडे, प्रमोद पवार, संजय जाधव, राजेंद्र पाटोळे, विनोद माने, बापू गाडे, मनोज बुधावले यांच्या पथकाने ही कारवाई केली. सपोनि हनुमंत गायकवाड तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: