Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डीपीसीसाठी विरोधक आक्रमक तर राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 12 : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक लढवण्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले सगळे पत्ते शेवटच्या क्षणी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व आहे. जिल्हा नियोजन समितीचे कामकाज हे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चालते. अडीच वर्षांपूर्वी राज्यात भाजप - शिवसेनेचे सरकार आल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेचे पालकमंत्री लाभले आहेत. मात्र, जिल्हा नियोजन समितीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनीही राष्ट्रवादीला चुचकारतच जिल्हा नियोजन समितीचे कामकाज चालवले आहे. आता जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर झाल्याने विरोधकांनी जास्तीतजास्त सदस्य आपल्या विचारांचे कसे निवडून आणता येतील या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. पालकमंत्र्यांवर अंकुश ठेवायचा असेल आणि जिल्हा नियोजन समितीवर वर्चस्व टिकवायचे असेल तर 40 जागांपैकी जास्तीतजास्त जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले पाहिजेत, अशी व्यूहरचना करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनीघेतला आहे. सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जिल्ह्याबाहेर आहेत.   येत्या दोन दिवसात ते सातार्‍यामध्ये येतील आणि  त्यानंतर जिल्हा नियोजन समितीतीलघडामोडी गतिमान होतील.  विरोधक नेमके कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज दाखल करणार
आहेत हे बघितल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपले पत्ते खुले करेल, अशी शक्यता आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विरोधकांचे उमेदवार निश्‍चित झाल्यानंतरच आपले उमेदवार जाहीर करण्याचेधोरण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: