Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विजेच्या धक्क्याने राजाळेतील तरुण शेतकर्‍याचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 12 :विजेचा धक्का लागून 28 वर्षीय तरुण शेतकर्‍याचा शेतात मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहिती-नुसार राजाळे, ता. फलटण गावाच्या हद्दीतील सुपारीनावाच्या शिवारातील विहिरी-जवळ कमलेश भरत निंबाळकर (वय 28, रा. राजाळे) हे बेशुद्ध अवस्थेत इलेक्ट्रिक मोटर केबीनजवळ मंगळवारी सकाळी आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. या बाबतची खबर रणजित निंबाळकर यांनी  दिली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: