Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाई येथे विजेच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: re4
5वाई, दि 12 : शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होवून बावधन, ता. वाई येथील शेतमजूर अजित तुकाराम जाधव (वय 27, रा. बेघरवस्ती, बावधन) याचा जागीत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत श्रीपती अंतू कांबळे यांनी पोलिसात खबर दिली आहे. घटनेची अधिक माहिती अशी, की अजित जाधव हा सकाळी 10.30 च्या सुमारास आपल्या शेतातील बांधावरील गवत कापण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर आपण शेतात गेलो त्यावेळी शेताच्या कडेला विजेच्या तारा तुटून पडलेल्या दिसल्या.
 त्याच्याजवळच उताण्या स्थितीत अजित जाधव पडला होता. त्यामुळे तातडीने वायरमन कुंभार यांना फोन केला. त्यांनी आल्यानंतर फोन करून मुख्य वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित केला. तत्पूर्वी अजित जाधव हा मयत झाला होता. तपास एस. एस. जाधव करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: