Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सदरबझार येथे तलाठ्याची आत्महत्या
ऐक्य समूह
Saturday, July 08, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 7 : सदरबझार येथे राहत्या घरातील हॉलमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेवून विलास सुदाम शिंगटे (वय 45, मूळ रा. मर्ढे ता. सातारा) यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या ते काशीळ येथे कार्यरत होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून  पोलीस तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी, शुक्रवारी दुपारी शिंगटे यांचा सातार्‍यातील घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आला. शिंगटे यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: