Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी
ऐक्य समूह
Friday, July 07, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: lo3
पाच संशयितांना पोलिसांनी पकडले
5सातारा, दि. 6 : गेल्या आठ महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नात फरारी असलेल्या पाच संशयितांना शाहूपुरी पोलीसठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा टाकून नामदेववाडी झोपडपट्टी, प्रतापगंज पेठ येथे शिताफीने पकडले.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची दिलीप लक्ष्मण खवले (वय 26), मारुती शेटीबा खवले (वय 32), संजय केरबा जाधव (वय 27), लक्ष्मण लाला जाधव (वय 27), किसन शेटीबा खवले (वय 42, सर्व रा. नामदेववाडी झोपडपट्टी, प्रतापगंज पेठ, सातारा) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे हेड कॉ. हिम्मत दबडे-पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 209/2016 मधील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील व पोलीस अधीक्षकांकडील फरारी आरोपी  हे नामदेववाडी झोपडपट्टीमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहे. त्यांनी त्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्याबाबतची माहिती देवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने नामदेववाडी झोपडपट्टी येथे सायंकाळी 7.20 च्या सुमारास छापा टाकून संशयितांना पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हे. कॉ. हिम्मत दबडे-पाटील, हसन तडवी, नाईक बालम मुल्ला, अधिकराव खरमाटे, कॉ. स्वप्निल कुंभार, मोहन पवार यांनी केली.
   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: