Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तक्रार अर्ज विनाचौकशी प्रलंबित ठेवणारा सहाय्यक फौजदार निलंबित
ऐक्य समूह
Friday, July 07, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : विनाचौकशी तक्रार अर्ज प्रलंबित ठेवणारे सहाय्यक फौजदार रमेश श्रीरंग फडतरे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रमेश श्रीरंग फडतरे यांनी तक्रारदारांचे 49 तक्रार अर्ज 2014 पासून विनाचौकशीने प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दाद मिळण्यास विलंब झालेला आहे. त्यास रमेश फडतरे हे कारणीभूत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यार कर्तव्यच्युती, बेशिस्त व बेजबाबदारपणाच्या वागणुकीचा ठपका ठेवून त्यांना सेवेतून निलंबित करुन त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.
निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय बोरगाव पोलीस ठाणे देण्यात आले असून निलंबन कालावधीत पोलीस अधीक्षक अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या परवानगी-शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही निलंबन आदेशात नमूद केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: