Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये सहा महिन्यांत 92 दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Friday, July 07, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे अशांत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना केंद्र सरकारने दिलेली मोकळीक आणि राज्य सरकारसह सर्व यंत्रणांचा समन्वय यामुळे मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात दहशतवादी ठार होण्याच्या  संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी 2 जुलैपर्यंत सुरक्षा दलांनी 92 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
यूपीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या दोन वर्षांपेक्षा रालोआ सरकारच्या कार्यकाळात भारतीय सुरक्षा दलांनी अधिक संख्येने दहशतवाद्यांना टिपण्यात यश मिळवले आहे. यूपीए सरकारच्या काळात 2012 मध्ये 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्येच सुरक्षा दलाच्या जवानांनी 92 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. मोदी सरकारच्या काळात 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यंदा 2 जुलैपर्यंत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे प्रमाण 2014 आणि 2015 मध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येच्या जवळपास जाणारे आहे, असे गृह मंत्रालयातील उच्चपदस्थांनी सांगितले. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यातील समन्वयामुळेच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई जोरात सुरू आहे. केंद्र सरकारनेसुरक्षा दलांना अधिक मोकळीकदिल्याचे परिणामही दहशत-वादविरोधी कारवायांमध्ये दिसत असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले. दहशतवाद्यांना टिपताना स्थानिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी सुरक्षा दले घेत आहेत, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: