Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍याच्याभक्कम बुरुजावर राज्यातील किल्ले जिंकणार : आ. पवार
ऐक्य समूह
Wednesday, July 05, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: lo2
शेतकर्‍यांच्या अन्यायावर अधिवेशनात आवाज उठवणार : पदांचा वापर लेटरपॅडसाठी करू नका
5सातारा, दि. 4 : राज्यात राष्ट्रवादीने फक्त सातारा आणि पुणे जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता मिळवली  आहे. राज्यात व केंद्रात सत्तापालट होवूनदेखील सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी पक्षाच्या जागा वाढल्या आहेत. सातारा पक्षाचा भक्कम बुरूज असून या बुरुजाच्या बळावरच राज्यातील अन्य किल्ले जिंकण्याचा संकल्प राष्ट्रवादीचे विधिमंडळातील नेते आ. अजित पवार यांनी केला. दरम्यान, कर्जमाफीत शेतकर्‍यांवर अन्याय झाला असून त्या विरोधात येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे, असेही त्यांनी सांगितले. संघटनेमुळे मिळालेल्या पदांचा वापर केवळ लेटरहेडसाठी करू नये. जाती-पातीचा व नात्या -गोत्याचा विचार न करता सर्वांना बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
येथील हॉटेल कल्याण रिसॉर्ट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी आ. पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, विधानपरिषदचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ.दीपक चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ.जयदेव गायकवाड,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, नीलेश कुलकर्णी व मान्यवर उपस्थित होते.
आ. अजित पवार म्हणाले,सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकंदर यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायला हवे. मतदारांचेही तितकेच आभार मानायला हवेत. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांना सातारा जिल्ह्याने साथ दिली. राष्ट्रवादीच्या विचाराला साथ देण्याचे व राष्ट्रवादीवर प्रेम करण्याचे काम सातारा जिल्ह्याने नेहमीच केले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
श्रीमंत संजीवराजे व जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांना मिळालेली पदे  संघटनेमुळे मिळाली आहेत हे त्यांनी लक्षातघ्यायला हवे. या पदाची सत्ता तुमच्या डोक्यात जावू देवू नका. 
प्रत्येकाच्या अडचणी व प्रश्‍न समजून घ्या. पदाधिकार्‍यांनी सर्वांना सहकार्य करावे. शंभर टक्के कामे होतील असे नाही, पण बहुतांशी प्रश्‍नांची उकल झाली पाहिजे. गतवेळच्या निवडणुकीत पक्षावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. पक्षांतर्गत कारवाया आणि गटा-तटाचे राजकारण यामुळे पक्षावर ही वेळ आली आहे. हे  आता थांबले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने मिळालेल्या पदाचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. कामात कमी पडत असतील त्यांना बाजूला केले पाहिजे. प्रत्येकाने पक्ष संघटनेसाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समिती नेमली पाहिजे. या समितीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला पाहिजे. नव्याने नियुक्ती होणार्‍यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घ्यावा. निष्ठावंतांचा सन्मान करावा. यापुढे पक्ष शिस्त महत्त्वाची असेल. पक्षात दुटप्पी राजकरण करणार्‍यांनी सावध रहावे. राष्ट्रवादी पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
आघाडी सरकारने जेव्हा कर्ज माफीचा निर्णय जाहीर केला तो स्पष्ट होता. मात्र, आत्ताचे सरकार कर्जमाफीबाबत रोज निर्णय बदलत आहे. गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रही असून जून 2017 अखेर कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. तसेच थेट सरपंच निवड हा निर्णय पंचायत राज त्रिसूत्री धोरणाला घातक आहे. त्यामुळे पालिकांप्रमाणे ग्रामपंचायतीच्या कारभारात विसंगती निर्माण होणार आहे. या निर्णयाला देखील आम्ही विरोध करणार आहोत. विद्यमान सरकारने केलेल्या घोषणांपैकी एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिक सरकारवर नाराज आहेत. कोपर्डी घटनेला एक वर्ष पूर्ण होत असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवूनही अद्याप दोषींना शिक्षा होत नाही ही खेदाची बाब आहे.
 पावसाळा सुरू असूनही आम्ही राज्यव्यापी दौरा काढला आहे.  या पावसात जी पेरणी होणार आहे त्यानंतर येणार्‍या पावसात राष्ट्रवादी जोमाने उगवली पाहिजे. विरोधाला विरोध करणे राष्ट्रवादीची भूमिका नाही. 30 जूनला संसदेत झालेल्या जीएसटीच्या कार्यक्रमावेळी शरद पवार पहिल्या रांगेत होते. कारण युपीए सरकारने ही संकल्पना मांडली होती. जीएसटीचा त्रास सर्वसामान्यांना होता कामा नये, ही राष्ट्रवादीची भूमिका होती. शेवटचा कार्यकर्ता कामाला लागला पाहिजे तरच राज्यातील सरकारमध्ये पुढील वेळेस बदल होईल. साखर कारखान्यांनंतर आता दूध संघांवर  सरकार कारवाई करणार,  असे म्हणते. संस्था उभी करायला अक्कल लागते, मोडायला लागत नाही. त्यामुळे सरकारने विचार करावा. जातीयवादी शक्तींचा धोका असून जातीय तेढ वाढवण्याचे काम हे सरकार करत आहे. त्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे आणि
सर्वसामान्य जनतेशी संवाद ठेवून पक्ष वाढवावा असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
आमदारांनी कार्यकर्त्यांशी संवाद ठेवण्याबरोबरच महिला कार्यकर्त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. महिला सर्व जबाबदारी सांभाळून पक्षाचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना पक्ष कार्यासाठी आठवड्यातून एकदा तरी गाडीत डिझेल भरून द्यावे. सगळ्यांना नाही परंतु ज्यांना गरज आहे त्यांना द्यावे. आपण जेव्हा कार्यकर्त्यांकडून अपेक्षा करतो, तेव्हा त्यांना मूलभूत गोष्टी दिल्या पाहिजेत. चांगले काम करणार्‍याचा विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवार म्हणून विचार करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे म्हणाले, मध्यावधी निवडणुकांचा इशारा सत्ताधारी पक्षांकडून दिला जात आहे. मध्यावधी निवडणुकांसाठी आपण सज्ज आहोत. देशात व महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होत असतानाही सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. शून्य टक्के व्याजदराने केवळ सातारा जिल्ह्यात शेतकर्‍याला कर्ज दिले जात आहे. त्याप्रमाणे राज्यातही कर्ज देण्यात यावे यासह विविध मागण्यांची सनद राज्य सरकारकडे सादर केली आहे. सरकारने जाहीर केलेली 34 हजार  कोटी रुपयांची कर्जमाफीची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. शिवसेना सत्तेत असूनही दुटप्पीपणाची भूमिका घेत आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय होताना सहभागी व्हायचे आणि निर्णय झाल्यानंतर त्याला विरोध करायचा, हा प्रकार राज्यातील जनतेच्या लक्षात आला आहे.  सोशल मीडियावरील भाजपच्या प्रचाराला बळी पडणार्‍या जनतेचे प्रबोधन करून

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: