Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृष्णेच्या तीन माजी संचालकांना जामीन
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 18 : कृष्णा साखर कारखान्यामधील बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या कारखान्याच्या चंद्रकांत विठ्ठल भुसारी (रा. टेंभू, ता. कराड), वसंत सीताराम पाटील (रा. नेर्ले, ता. वाळवा), महेंद्र ज्ञानूमोहिते (रा. वाटेगाव, ता. वाळवा)या आणखी तीन माजी संचालकांनागुरूवारी जामीन मंजूर झाला. यापूर्वी चार जणांची जामीनावर मुक्तता झाली असून आज, शुक्रवारी अन्य एका अर्जावर सुनावणी होणार आहे. 
रेठरे बुद्रुक येथील कृष्णा साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ऊस तोडणी
वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. शेतकर्‍यांनी 2013-14 साली तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे बँकेचे नोटीसीनंतर समोर आले. या प्रकरणात कारखान्याचे माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, माजी संचालक, कार्यकारी संचालक तसेच दोन कामगारांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी चार जणांची यापूर्वी जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. तर गुरुवारी चंद्रकांत विठ्ठल भुसारी (रा. टेंभू, ता. कराड), वसंत सीताराम पाटील (रा. नेर्ले, ता. वाळवा), महेंद्र ज्ञानू मोहिते (रा. वाटेगाव, ता. वाळवा) या आणखी तीन माजी संचालकांची जामीनावर मुक्तता झाली. आतापर्यंत सात जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: