Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोंबडवाडी येथे तलावात पडून मुलीचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: re2
5रहिमतपूर, दि. 17 : कोंबडवाडी, ता. कोरेगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरुन तलावात बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद सतीश शंकर यादव (वय 35) रा. आर्वी यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सौ. रेश्मा राहुल चव्हाण (रा. किरोली) या त्यांच्या दोन्ही मुलींसह सानिया व मधुरा या त्यांचा मामा गणेश बाळकृष्ण यादव (रा. आर्वी)  यांच्याकडे पाच सहा दिवसांपूर्वी उन्हाळी सुट्टीसाठी राहायला गेल्या होत्या. दि. 17 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास कोंबडवाडी गावच्या हद्दीत असलेल्या तलावात आजोबा बाळकृष्ण भिकू यादव, आजी सौ. विमल बाळकृष्ण यादव व तिची मावशी यांच्या समवेत सानिया राहुल चव्हाण (वय 15),  आदिती सुरेश गुजर (वय 11) असे मिळून कपडे धुण्यासाठी सकाळी 9.15 च्या सुमारास गेले असता सानिया ही कपडे धुवत असताना पाय घसरुण पाण्यात बुडाली. तिचे आजोबा बाळकृष्ण यादव यांनी तिला तत्काळ बाहेर काढले व वाठार येथील प्राथमिक केंद्रात घेवून गेले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिची तपासणी केली असता ती मृत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. हवालदार शिंदे तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: