Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निवासी मिळकतींना चार, बिगर निवासींना दहा टक्के कर वाढ
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: lo1
सातारकरांना घरपट्टी वाढीत दिलासा; दोन्ही आघाड्यांच्या मनोमीलनाचा निर्णय
5सातारा, दि. 20 : सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने घरपट्टीच्या वाढीच्या निर्णयावर सातारकरांना दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या तीन मतांनी एकत्रित निर्णय घेतल्याने मोठी घरपट्टीवाढ टळली आहे. मूल्यवाढ निर्धारण समितीने निवासी मिळकतींसाठी चार टक्के घरपट्टीवाढ केली आहे. बिगर निवासी मिळकतींसाठी दहा टक्के घरपट्टीवाढ केली आहे.
सातारा नगरपालिकेच्या अपिलीय समितीकडे वीस हजार अपिले दाखल झाली होती. या अपिलांच्या अर्जांवर सुनावणी होऊन दि. 20 रोजी प्रांताधिकारी स्वाती देशमुख, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, विरोधी पक्षनेते अशोक मोने व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सविता फाळके यांच्या उपस्थितीत निवासी मिळकतींना चार टक्के तर बिगर निवासी मिळकतींना दहा टक्के करवाढ अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला.कोल्हापूर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक एस.एस.पाटील हे मात्र गैरहजर होते.  समितीमधील तीन लोकप्रतिनिधींनी घरपट्टी वाढीच्या विरोधात मत मांडले. तीन विरुद्ध दोन या मतांनी हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. पूर्वीच्या वर्षिक भाडे अंदाजावर केलेली तीस टक्के वाढ ही जास्त असल्याने वाणिज्य कर दहा टक्के वाढवण्याचा निर्णय अंतिम झाला. चार वर्षापूर्वी वाणिज्यसाठी आठ टक्के वाढ करण्यात आली होती. यंदा त्यामध्ये दोन टक्के जादा वाढ करण्यात आली आहे. नवीन मिळकतींसाठी वार्षिक भाडे अंदाजाच्या तुलनेत 50 टक्के घरपट्टी कमी असावी, असे मत नगराध्यक्षा माधवी कदम, अशोक मोने व सविता फाळके यांनी मांडले. त्यामुळे तीन लोकप्रतिनिधींच्या बहुमतामुळे निवासी घरपट्टी 26 टक्क्याने तर बिगरनिवासी घरपट्टी 20 टक्क्यांनी कमी झाली. नवीन मिळकतींसाठी नवीन आकारणी 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. 2014 ते 2018 या चतुर्थ वार्षिक पाहणीनुसार ही घरपट्टी अंतिम करण्यात आली आहे. या निर्णयामुळे  सातारा शहरातील 34 हजार मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: