Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बेकायदेशीर नळ कनेक्शनमुळे सातारकरांना कमी दाबाने पाणी
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 19 : सातारा शहरात फुकट पाणी वापरणार्‍या बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांमुळे नियमित करदात्या सातारकरांना पुरेशा दाबाने पाणी मिळेनासे झाले आहे.
शहराच्या पूर्व व पश्‍चिम भागातील पाणीचोर शोधणे ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ना सातारा पालिकेला शक्य झाले आहे. साधारण 90 लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याने पाणीचोरांना आळा कसा घालायचा हा कळीचा मुद्दा आहे. यूआयडीएसएसएमटी योजनेअंर्तगत सातारा शहरासह लगतच्या उपनगरांमध्ये तब्बल 13 टाक्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेचा तत्कालीन मनोमीलनाच्या कारभार्‍यांकडून खूपच गाजावाजा करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या कामासाठी पुण्याची ठेकेदार कंपनी योजली, मात्र सात वर्षे झाली तरी योजना पूर्ण झालेली नाही. दरम्यान प्राधिकरणाने निळ्या कनेक्शनचे जे साडेतीन ते चार हजार जोड सातारा शहरात दिले आहेत त्याची नोंदच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात नाही. कधी तोंडी सांगण्यावरून तर कधी दबावापोटी जी कनेक्शन शहराच्या पश्‍चिम भागात दिली गेली त्याचा लेखी तपशील गायबच आहे. निळ्या पाइपने प्राधिकरणाने दिलेली कनेक्शन आणि पालिकेकडे असणार्‍या नळ कनेक्शनच्या नोंदीमध्ये 3765 कनेक्शनची तफावत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्राधिकरणाच्या कनेक्शनचा आढावा घेताच त्यांना मोठा धक्का बसला होता. प्राधिकरणाच्या ठेका कंपनीने या पाणीपुरवठा योजनेतून अंग काढून घेतल्याने साडेतीन हजार कनेक्शन धारकांच्या यादीची आजपर्यंत खात्री झालेली नाही. पालिकेकडून 1500 रुपये पाणीपट्टी आकारली जाते.   
 साधारण साडेतीन हजाराच्या हिशोबाने पाच लाख रुपयांचा
महसूल वसुलीअभावी पाण्यात जात आहे. या गोष्टीला आता पावणेदोन वर्षे उलटत आली तरी पालिकेला या गंभीर प्रकरणाचे काहीच देणे-
घेणे नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: