Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेरले येथे कार अपघातात एक ठार, दोन जखमी
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 10:57 AM (IST)
Tags: re1
5उंब्रज, दि. 17 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेरले, ता. कराड गावच्या हद्दीत पेरले फाटा येथे मारुती ऑल्टो कारचा टायर फुटून कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला महामार्गावरून सेवा रस्त्यावर उलटली. या अपघातात राहुल हरिष अग्रवाल (वय 28, रा. राज टॉवर, कात्रज, पुणे) हा युवक जागीच ठार झाला तर शुभम शिवाजी मोहिते (वय 21, रा. सातारा) व अनुप गुजराथी (वय 31, रा. पुणे) हे जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास कराडहून सातारा दिशेने निघालेली मारुती ऑल्टो कार (एमएच-11-एके-5301) पेरले गावच्या हद्दीत आली असता पेरले फाटा येथे कारचा टायर फुटला. त्यानंतर कार दुभाजकाला धडकून महामार्गाच्या सातारा-कराड लेनवर उलटून आठ फूट खोल सेवा रस्त्यावर जाऊन पडली. या अपघातात राहुल अग्रवाल हा युवक जागीच ठार झाला तर शुभम मोहिते गंभीर जखमी आणि अनुप गुजराथी हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करणत आले आहे. या अपघातातील किरकोळ जखमी झालेला अन्य एक जण  घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, दत्तात्रय पवार, विकास नलवडे, अण्णासाहेब पवार, अजय भोसले, हवालदार बर्गे, शशिकांत कणसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरार्पंत उंब्रज पोलीस ठाण्यात सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: