Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड अर्बन बँकेमध्ये अजिंक्यतारा बँक व अजिंक्यतारा महिला बँकेचे होणार विलीनीकरण
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 11:04 AM (IST)
Tags: re1
बँकेने गाठला 4600 कोटी व्यवसायाचा टप्पा, 60 कोटींचा ढोबळ नफा
5कराड, दि. 17 : शतक महोत्सवी कराड अर्बन बँकेमध्ये अजिंक्यतारा बँक व अजिंक्यतारा महिला सहकारी बँक यांच्या विलीनीकरणास रिझर्व्ह बँक व सहकार खात्याने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे कराड अर्बन बँकेच्या आदर्श कारभारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी व चेअरमन डॉ. सुभाष एरम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बँकेचे व्हाईस चेअरमन समीर जोशी,  मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, ज्येष्ठ संचालक विद्याधर गोखले व संचालक उपस्थित होते.
जोशी व डॉ.एरम म्हणाले, अजिंक्यतारा बँक व अजिंक्यतारा महिला बँक यांचे दि. 29 मे रोजी विलीनीकरण होणार आहे. या दोन्ही बँकांच्या मिळून 13 शाखा आहेत. या विलीनीकरणानंतर कराड अर्बनच्या शाखांची संख्या 61 होणार आहे. दि. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कराड अर्बन बँकेच्या ठेवी 2850 कोटी व कर्जे 1750 कोटी रुपये, एकूण व्यवसाय 4600 कोटी, ढोबळ नफा 60 कोटी तर करोत्तर नफा 28 कोटी रुपये आहे. सीआरएआर 16.86 टक्के आहे. ‘व्हिजन 2017’ नुसार ठरवलेली व्यवसायाची उद्दिष्टे नियोजनबद्ध पद्धतीने साध्य केली आहेत.
बँकेने दहा वर्षांपूर्वी सांगली येथील पार्श्‍वनाथ बँकेचे विलीनीकरण करून घेतले होते. दहा वर्षात त्या बँकेचा तोटा भरून काढून सभासदांना शेअर्सची रक्कम परत देण्यास बँक सज्ज झाली आहे. पार्श्‍वनाथ बँकेचे विलीनीकरण ऐच्छिक होते. आता अजिंक्यतारा बँक व अजिंक्यतारा महिला बँकेचे विलीनीकरण करून घेणारी कराड अर्बन ही पश्‍चिम महाराष्ट्रातील विश्‍वासू बँक ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दिलेली सेवा, कोअर बँकिंग प्रणाली यामुळे बँकेने प्रगती केली आहे. नोटाबंदीच्या काळात बँकेने ग्राहकांना जास्तीत जास्त रोकड उपलब्ध करून दिली. बँक 101 व्या वर्षात पदार्पण करत असताना होणारे हे विलीनीकरण बँकेच्या प्रगतीत भर घालणारे ठरेल. बँकेने शतक महोत्सवी वर्षात कराड व सातारा येथे सायकल रॅली, गोंदवले ते पंढरपूर सायकल वारी, वृक्षारोपण, पर्यावरणदिन, उद्योजकता, चिंतन व अपंग शिबिरे असे उपक्रम राबविले. शताब्दीची स्मृती कायम रहावी यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात अत्याधुनिक, वातानुकूलित सभागृह बांधले आहे.
कराड येथे झालेल्या ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पुणे विभागीय अधिवेशनाचे प्रायोजकत्व बँकेने स्वीकारले होते. बँकेने ज्येष्ठ
नागरिकांचे पालकत्व स्वीकारण्याची अभिनव योजना सुरू केली
आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तम सेवा दिल्याबद्दल बँकेस हैद्राबाद येथील खऊठइढ संस्थेकडून इशीीं खढ एपरलश्रशव उे-ेशिीरींर्ळींश इरपज्ञ पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांच्या हस्ते मिळाला.
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स असोसिएशन व कराड अर्बन बँक यांच्यावतीने राज्यातील नागरी सहकारी बँका, जिल्हा बँका, देशभरातील नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसाठी दि. 11 जून रोजी कराड येथे आयटी परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बँकेने शताब्दी वर्षात सभासदांना प्रशिक्षित करण्यासाठी कराड, सातारा, पुणे, म्हसवड, कोल्हापूर, सांगली येथे सभासद व ग्राहक मेळावे घेतले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: