Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत
ऐक्य समूह
Friday, April 14, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: lo6
5सातारा, दि. 13 ः नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा आरोप ठेवून त्यांना पाकिस्तान सरकारने अटक केली. तसेच फाशीची शिक्षा सुनावून भारतविरोधी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन सिद्ध केला आहे. याविरोधात केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेऊन, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव आणून त्यांच्या सुटकेसाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी
मागणी जिल्हा काँग्रेस
कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, या
संदर्भात काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
देण्यात आले.
काँग्रेस कमिटीत आयोजित केलेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष, आ. आनंदराव पाटील, जिल्हा प्रभारी अभय छाजेड, अ‍ॅड. विजयराव कणसे, अशोकराव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, तौफीक मुलाणी, बाबासाहेब कदम, सौ. धनश्री महाडिक, राजनंदा जाधवराव, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, बाबूराव जंगम, धैर्यशील सुपले, किशोर बाचल, रोहिणी निंबाळकर, गोल्डन पवार, जयकुमार शिंदे, नरेश देसाई, नंदाभाऊ जाधव, किसनराव भिलारे, प्रल्हादराव चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सुपुत्रासाठी केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तावर दबाव आणावा. त्यांच्या सुटकेसाठी तातडीने पावले उचलावीत. अन्यथा देशाचे संरक्षण करणार्‍या जवानांच्या आणि कुटुंबीयाच्या मानसिक धैर्यावर गंभीर परिणाम होईल. काँग्रेसने नेहमीच देशहिताचा विचार केला आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जनतेतून उठाव
झाला पाहिजे, या हेतूने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर व्यापक स्वाक्षरी मोहीम
उघडली आहे. जाधव यांच्या सुटकेबाबत केंद्र सरकारने उदासीनता दाखविल्यास काँग्रेस पक्ष अधिक आक्रमकपणे उपोषण, मोर्चे, या मार्गाने देशहिताची चळवळ गतिमान करून सरकारला सळो की पळो करून सोडेल, अशा भावना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील निवेदन  जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: