Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जाधववाडीत फळबागा व शेती साहित्य आगीत भस्मसात
ऐक्य समूह
Saturday, March 18, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: re1
7 शेतकर्‍यांचे 37 लाखांचे नुकसान
5फलटण, दि. 17 : जाधववाडी गावच्या हद्दीत विंचुर्णी रोडवरील 7 शेतकर्‍यांच्या शेतातील फळबागा, पी. व्ही. सी. पाइप, ठिंबक सिंचन संच, औषध फवारणी मशिनरी, सिंटेक्स टाक्या व अन्य पिके शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून भस्मसात होऊन त्यात सुमारे 37 लाख 48 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जाधववाडी, ता. फलटण गावचे हद्दीतील राजेंद्र निंबाळकर, बाबूराव आडके, डॉ. माधव पोळ, सोपानराव पोळ, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नादिया कुरेशी, समीरा कुरेशी या 7 शेतकर्‍यांच्या शेतीतील उभी पिके, फळबागा व अन्य साहित्य वीज तारांच्या घर्षणानेे लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. या सर्वांचे मिळून 37 लाख 48 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गावकामगार तलाठ्यांनी केला आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.
राजेंद्र शरद निंबाळकर यांच्या सर्व्हे नं. 28 अ मधील 2.70 हेक्टर क्षेत्रात असलेल्या पिकांना लागलेल्या आगीत 254 डाळिंबाच्या झाडांचे 5 लाख 8 हजार रुपये, 3 इंची पी. व्ही. सी. पाइप व ठिंबक संच 30 हजार रुपये, पी. व्ही. सी. पाइप 3 इंची 50 फूट 7 हजार रुपये, 50 फूट केबल 5 हजार रुपये आणि 2 इंची 150 फूट पी. व्ही. सी. पाइप 1500 रुपये असे एकूण 5 लाख 51 हजार 500 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. बाबूराव विठ्ठल आडके यांच्या सर्व्हे नं. 29/2 अ क्षेत्रातील 2.5 इंची पी. व्ही. सी. पाइप  15 नग 4500 रुपये, 20 आर क्षेत्रातील ठिंबक सिंचन संच 1500 रुपये, 50 फूट केबल 4000 रुपये आणि कडबा 2000 रुपये असे 12 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
डॉ. माधव आबाजी पोळ यांच्या सर्व्हे नं. 30/6 मधील फळबागेपैकी चिकूची 120, पेरूची 200 व आंब्याची 200 झाडे जळून 3 लाख 20 हजार रुपये, एक हेक्टर 41 आर क्षेत्रातील ठिबक सिंचन संच 90 हजार रुपये, केबल 3000 रुपये, 4 इंची पी.व्ही.सी. पाइप 5000 रुपये आणि औषध फवारणीची यंत्रणा 35 हजार रुपये असे एकूण 4 लाख 53 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोपानराव आबाजी पोळ यांच्या सर्व्हे नं. 30/4 मधील  120 चिकू झाडे, 900 डाळींब झाडांचे 19 लाख 20 हजार रुपयांचे, या क्षेत्रातील ठिबक सिंचन संचाचे 90 हजार रुपयांचे, केबल 3 हजार रुपयांचे, 4 इंची पी.व्ही. सी. पाइप 7 नग 7 हजार रुपये आणि औषध फवारणी यंत्रणा 35 हजार रुपये असे एकूण 20 लाख 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सर्व्हे नं. 28 अ मधील 50 आंबा, 30 नारळ, 50 चिकू झाडांचे 1 लाख रुपयांचे, 2.5 इंची 60  व 3 इंची 50 पी.व्ही. सी. पाइप 28 हजार रुपये, 6 हजार फूट ठिबक सिंचन यंत्रणा 17 हजार रुपये, फायबर बोट 2 नग 2 लाख 60 हजार रुपये, प्रेशर कॉक 12 नग   4 हजार रुपये, केबल 2 हजार फूट 10 हजार रुपये, सिंटेक्स 3 टाक्या 3 हजार रुपये असे एकूण 4 लाख 22 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नादिया झिया कुरेशी यांच्या सर्व्हे नं. 29/2 अ/4 अ मधील 20 आर हत्ती घासाचे 15 हजार रुपयांचे. समीरा झिया कुरेशी यांच्या सर्व्हे नंबर 29/2 अ/3 या क्षेत्रातील ग्लिशिडिया  1 हेक्टर 1 लाख रुपये, सुबाभूळ 40 हजार रुपये, ठिबक सिंचन पाइप 90 हजार रुपये,  4 इंची 13 पी.व्ही.सी. पाइप 10 हजार 400 असे एकूण 2 लाख 40 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठ्यांनी पंचनामा केला असून कृषी सहाय्यक व अन्य पंचांनी पंचनाम्याच्यावेळी उपस्थित राहून त्यांना मदत केली. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: