Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अतीत येथे युवकावर तलवारीने खुनी हल्ला
ऐक्य समूह
Saturday, March 18, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 17 ः टेम्पो भाड्याच्या पैशावरून झालेल्या भांडणात युवकावर गावातीलच एकाने तलवारीने खुनी हल्ला केल्याची  घटना अतीत, ता. सातारा येथे गुरुवार, दि. 16 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. संभाजी बबन जाधव (रा. अतीत, ता. सातारा) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर सातारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संजय विष्णू कारंडे (रा. अतीत), या संशयितावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी जाधव आणि संजय कारंडे यांच्यात टेम्पो भाड्याच्या पैशावरून गुरुवारी रात्री अतीत-शिरगाव रस्त्यावर भांडण सुरू होते. यावेळी संजय कारंडे याने संभाजी जाधव याच्या डोक्यात तलवारीने वार केला. या हल्ल्यात संभाजी हा गंभीररीत्या जखमी झाला.
त्याला तातडीने सातारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सुनील यशवंत केंजळे (वय 30, रा.अतीत, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संजय विष्णू कारंडे या संशयितावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैराटकर तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: