Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यसेवा परीक्षेत पूनम पाटील मुलींमध्ये राज्यात प्रथम
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 16 ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत गोडोली येथील पूनम संभाजीराव पाटील या मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सातारा, कराड येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावलेल्या व सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षक असलेल्या संभाजीराव पाटील यांची ती मुलगी आहे.
पूनम यांचे प्राथमिक शिक्षण येथील महाराजा सयाजीराव हायस्कूलमध्ये झाले. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे, तर बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी बी. ई. (मेकॅ.) ची पदवी घेतली. लोकसेवा आयोगाची परीक्षा त्या तीनवेळा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये सहाय्यक अभियंता वर्ग 2, नगरपालिका मुख्याधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक, अशा तीन पदांवर त्यांची   निवड झाली आहे. राज्यसेवा परीक्षेत त्यांनी राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. या यशाबद्दल पोलीस खात्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: