Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्य, केंद्रशासित ‘जीएसटी’ला हिरवा कंदील
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: na3
1 जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होण्याचा मार्ग मोकळा
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वस्तू आणि सेवा कर कायद्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून देशात ‘जीएसटी’ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली. 1 जुलैपासून हा कायदा लागू करण्यास सर्व राज्ये तयार आहेत. जीएसटी कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून यावर काम करत आहेत, असे अरुण जेटलींनी सांगितले. वस्तू आणि सेवा कर कायद्याबाबत राज्ये व केंद्र सरकारची बैठक झाली. या आधी 4 मार्च रोजी झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने ‘आयजीएसटी’, ‘सेंट्रल जीएसटी’ आणि ‘नुकसानभरपाई विधेयक यांना मंजुरी दिली होती.
आता 31 मार्च रोजी होणार्‍या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटीचे नियम निश्‍चित करण्यात येतील. नियम निश्‍चित केल्यानंतर कराचे दर ठरविले जातील. 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असे जेटली यांनी सांगितले.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: