Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मळणी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: re1
अंबवडे संमत कोरेगाव येथील दुर्घटना
5कोरेगाव, दि. 16 (प्रतिनिधी) : डोक्याला गुंडाळलेला स्कार्फ मळणी मशीनमध्ये ओढला गेल्याने महिला मशीनमध्ये ओढली गेली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. सारिका दीपक जाधव (वय 35) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून अंबवडे संमत कोरेगाव येथे गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सारिका जाधव या भाडळे हायस्कूल येथे हंगामी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात शिपाई आहेत. सारिका जाधव यांच्या अपघाती निधनाने अंबवडे गावावर शोककळा पसरली आहे. या संदर्भात माणिक बळीराम जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सातारारोड दूरक्षेत्राचे हवालदार सत्यवान बसवंत तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: