Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लैंगिक अत्याचार प्रकरणात अल्पवयीन मुलावर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 16 : सात  वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या काशीळ, ता. सातारा येथील एका अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सो कायद्यान्वये बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या घरच्यांनी बुधवारी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास संबंधित बालिका घराजवळील शेडलगत असणार्‍या मोकळ्या जागेत खेळत होती.
त्यावेळी येथीलच एका अल्पवयीन मुलाने सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.  हवालदार खुडे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: