Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वेण्णा लेक व लिंगमळा परिसर हिमकणांनी पुन्हा गोठला
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: re3
5महाबळेश्‍वर, दि. 13 : होलिकोत्सव सर्वत्र धूमधडाक्यात साजरा होत असतानाच महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्‍वरमध्ये वेण्णा लेक व लिंगमळा परिसराने आपला होलिकोत्सव हिमकणांची दुलाई पांघरून साजरा केला. प्रसिद्ध वेण्णा तलाव व लिंगमळा परिसरात पहाटे प्रचंड थंडी होती. तेथे शून्य अंश डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमान होते. परिसरात सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण तयार झाल्याचे सुखद चित्र होते. उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला व होळीच्या दिवशी अशा प्रकारे हिमकण दिसणे हे अत्यंत दुर्मीळ म्हणावे लागेल. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्‍वर शहराचे किमान तपमान 9.0 डिग्री सेल्सियस तर वेण्णा तलाव परिसरात ते शून्य अंश डिग्रीपेक्षा कमी असल्याचे जाणवत होते.
दोन दिवसांपासून  या नंदनवनात थंडीचा जोर वाढला होता. होळी-धुळवड व त्याला जोडून आलेली शनिवार-रविवारची सलग तीन दिवसांची सुट्टी. त्यामुळे हे गिरीशिखर हौशी पर्यटकांनी बहरून गेले आहे. त्यातच गेले दोन दिवस येथे थंडीचा जोर वाढल्याने पर्यटक सुखावला होता. राज्यात अन्य ठिकाणी उन्हाळी हंगामाची चाहूल लागून दुपारच्या वेळेस रखरखते उन जाणवत असताना मात्र या नंदनवनात सुखद गारवा अनुभवयास मिळत असल्यामुळे येथे फिरायला आलेला पर्यटक आपल्या परिवारासह आनंदात आहे. त्यातच रात्रीपासून तपमान झपाट्याने उतरत गेले. त्यामुळे हा परिसर गारठून गेला होता. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठून हिमकण तयार झाल्याचे दृश्य पहावयास मिळाले. होळीसह आलेल्या सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांनी याचा मनमुरादपणे आनंद लुटला. लिंगमळा भागातील स्मृतिवन असो वा याच परिसरातील स्ट्रॉबेरी, मलबेरी या फळांच्या बागा असो, सर्वत्र दवबिंदू गोठल्याने हिमकण फार मोठ्या प्रमाणावर जमल्याने परिसर हिमकणांनी पांढरा शुभ्र झाल्याचे दिसत होते. वेण्णा तलाव परिसरातील प्रत्येक वस्तूवर हिमकण जमा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अर्थात नौकाविहारासाठीची जेटी,
या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांचे टप, झोपड्यांवरील छपरे, झाडेझुडपे, वनस्पती त्यास अपवाद कसे बरे असणार? सर्व ठिकाणी हिमकणांची चादर पसरल्यासारखे मनमोहक चित्र दिसत होते.
दरम्यान, हिमकण आणि हे पर्यटन स्थळ यांचे नाते जरी अतुट असले तरी सर्वसाधारण नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या थंडीच्या हंगामात नेहमी असे दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळते. मात्र मार्च महिन्यात उन्हाळी हंगामात ते पाहायला मिळणे हा अत्यंत दुर्मीळ योग म्हणावा लागेल. कारण होळीच्या दरम्यान  सर्वत्र उन्हाची रखरख असते. अशा वेळी या नंदनवनातील निसर्गाने हिमकणांची शाल पांघरल्याने सर्व परिसर पांढराशुभ्र झाल्याचे सुखद चित्र पहावायास मिळणे हा येथील स्थानिकांप्रमाणे पर्यटकांनाही पर्वणीच  म्हणावी लागेल. त्याचा आनंद स्थानिकांप्रमाणे पर्यटकांनीही

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: