Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेंद्रे येथील अपघातात एक ठार
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 13 : सातारा-शेंद्रे रस्त्यावर शनिवारी (दि. 11) रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमीचा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी, संजय दादा गायकवाड (वय 45, रा. आसनगाव, ता. सातारा) यांचा दि. 11 रोजी रात्री सव्वादहा वाजता शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव पुलावर अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: