Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एसटीमध्ये महिलेचा व मुलीचा विनयभंग करणार्‍याची यथेच्छ धुलाई
ऐक्य समूह
Tuesday, March 14, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : एसटीमध्ये एक महिलेचा आणि एका मुलीचा विनयभंग करणार्‍या विष्णूनंद रमया यादव (वय 45, सध्या रा. विसावा नाका, सातारा) याची प्रवशांनी यथेच्छ धुलाई केली असून त्यास सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार महिला 29 वर्षीय असून सध्या त्या मुंबईला राहत आहेत. दि. 12 रोजी त्या जोतिबा-पुणे या एस. टी. मध्ये बसल्या होत्या. त्यांच्याशेजारी सातार्‍यातीलच एक युवती बसली होती. एस.टी. उंब्रज येथे आल्यानंतर पाठीमागील सीटवर असणार्‍या संशयिताने सीटखालून हात घालून महिलेची छेड काढली. हात चुकून लागला असेल असे समजून महिला शांत राहिली. त्यापुढे महिलेशेजारी असणार्‍या युवतीच्या बाबतीतही तसाच प्रकार घडला.
उंब्रज ते शिवराज पेट्रोलपंप दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे या घटनेनंतर दोन्ही महिला संतप्त बनल्या. वारंवार असा प्रकार घडल्यानंतर महिलांनी एस. टी. वाहकाकडे व चालकाकडे तक्रार केली. एव्हाना सगळा प्रकार प्रवशांच्याही लक्षात आला. या प्रकरामुळे प्रवासी संतप्त झाले. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी त्याची धुलाई केली. चालकाने घटनेचे गांभीर्य ओळखून एस.टी. पोलीस ठाण्यामध्ये नेली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर महिलांनी घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती दिली. पोलीस निरीक्षक बी.
आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश हिंडे
तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: