Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘हिजबुल’च्या तीन दहशतवाद्यांना अटक
ऐक्य समूह
Thursday, March 09, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात करण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये बेमिना बायपास चौकात ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी दिली.
‘हिजबुल’च्या रियाज अहमद वणी, इकलाख अहमद खांडे व तौसिफ उल नबी या तीन दहशतवाद्यांना मंगळवारी सायंकाळी नियमित नाकाबंदी दरम्यान पकडण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. हे तिघेही उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्याकडून चिनी बनावटीची दोन पिस्तूल, चार हातबॉम्ब, एक वायरलेस संच, 20 काडतुसे, स्फोटकांचे एक पॅकेट, अशी शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ‘आयसिस’च्या एका संशयित दहशतवाद्याबरोबर चकमक सुरू असतानाच श्रीनगरमध्ये या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या अटकेमुळे ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ला मोठा हादरा बसला आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: