Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नंदनवन गृहप्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात
ऐक्य समूह
Wednesday, October 22, 2014 AT 11:27 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 21 : पुण्यातील श्री उद्योग समूहाच्यावतीने उभारण्यात आलेल्या नंदनवन पॅराडाईजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या बजेटमध्ये हक्काचे घर मिळावे या उद्देशाने कोंडवे येथे नंदनवन गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन प. पू. नंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, यावेळी लेखक जगन्नाथ शिंदे यांच्या "नंदनवन' या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार आनंदराव पाटील, प. पू. नंदगिरी महाराज, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, ज्ञानेश्वर फडतरे, विशाल बेनकर, विशाल दुगाणे, सुभाष निंबाळकर, बिरंदर पंडीत, विजय वाघमळे, नीलेश वारागडे, संदीप कुचेकर, दिलीप कुराडे, गोविंद गांधी, प्रशांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नंदनवन कवितासंग्रहात ज्यांच्या कविता आहेत त्यांचा सत्कार संदीप शिंदे व आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दोन वर्षापूर्वी नंदनवन पॅराडाईजचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आज या इमारतीचे उद्‌घाटन केले आहे. याचा प्रतिसाद पाहूनच येथून जवळ असणाऱ्या कोंडवे गावात नंदनवन गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. नंदनवन गृहप्रकल्प हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातला असणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
श्री उद्योग समूहाने उभारलेला नंदनवन पॅराडाईज हा उत्तम प्रकल्प असून निर्सग सौंदर्य व वाढत्या शहरीकरणाचा विचार करून याची रचना केल्यामुळे नागरिकांना सोयीस्कर पडणार आहे. त्यामुळे याचा स्थानिक नागरिकांना जास्त फायदा होणार आहे. या पॅराडाईजमध्ये सर्व सोयी असल्यामुळे जास्त दूर जाण्याची गरज भासणार नाही. याचप्रमाणे गृहप्रकल्पाची उभारणी करून सर्वसामान्य नागरिकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न मार्गी लावण्यात श्री उद्योग समूह हातभार लावत असल्याचे पाटील व शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: