Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चेतना सिन्हा सन्मानित
ऐक्य समूह
Saturday, October 18, 2014 AT 11:15 AM (IST)
Tags: re3
5म्हसवड, दि. 17 : माणदेशी महिला सहकारी बॅंक व माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांना महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड व माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमती चेतना सिन्हा व बॅंकेच्या संचालिका सौ. शारदा मदने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या, मेंढपाळ तसेच भाजी विके्रत्या करणाऱ्या महिलांना बॅंक आपल्या दारी या सेवासुविधा देण्याच्या उद्देशाने बॅंक सुरू करण्यात आली आहे. बॅंक या महिलांना व्यवसाय निगडित कर्ज व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी गेली 17 वर्षे कार्य करत आहे. माणदेशीच्या दृष्टीने हा पुरस्कार महत्त्वाचा ठरतो. ग्रामीण भागातील महिलांसाठी बॅंक करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार रूपाने मिळत असलेली ही पोहोचपावतीच आहे.
श्रीमती चेतना सिन्हा यांनी ग्रामीण भागातील महिलांना घरपोच भांडवल व प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजिका बनविले आहे. महिला सबलीकरणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात बॅंकेची स्थापना केली. फौंडेशनद्वारेही त्यांनी उद्योगिनी व्यावसायिक प्रशिक्षण-फिरती व्यवसाय प्रशिक्षण शाळा सुरू केली आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशनची स्थापना करून ग्रामीण लोकांच्या कलागुणांना त्यांनी वाव दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: