Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रामीण भागात वाचनालयांची गरज
ऐक्य समूह
Friday, September 19, 2014 AT 11:16 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि.18 : "वाचनसंस्कृती संपत चालल्याचा समज चुकीचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांना वाचायला पुस्तके हवी आहेत. ग्रामीण भागात वाचनालये काढून वाचन चळचळ वाढवली पाहिजे', असे मत उद्योजक आणि ग्रामीण भागात "ग्यान की वाचनालय' सुरू केलेल्या प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले.
येथील ललित लेखिका कुमुद कदरकर यांनी लिहिलेल्या "असंच काही मनातलं' या पुस्तकाचे प्रकाशन दहावी दिवाळीतर्फे लोखंडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी प्रा.नीला कदम, कल्पना मुद्रणालयाचे संचालक आनंद लाटकर, संदीप मेहेरकर, चित्रकार प्रमोद देवरुखकर, वैशाली मिसाळ, अरुणा कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोखंडे म्हणाले, वाचन संस्कृती टिकवल्याने मराठी भाषेचेही जतन होईल. नव्या पिढीपर्यंत सकस लेखन पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी उत्तम साहित्य निर्मिती झाली पाहिजे. सौ. कुमुद कदरकर यांनी शब्दबद्ध केलेले हे पुस्तक सकारात्मक दृष्टी देणारे आणि छोट्या- छोट्या गोष्टींमधून आनंदाचा ठेवा देणारे आहे. ग्रामीण भागात वाचनालये सुरू करून एक चळवळ उभी केली पाहिजे.
सौ. कुमुद कदरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, "जीवनातले अवघड विषय अतिशय सोप्या, हळुवार शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. सर्व लिखाण लहान बाळाच्या मऊ मऊ मुलायम पावलासारखे व सर्वस्पर्शी आहे. जीवनाचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे व आनंदी जीवनाचा महामंत्र सांगणारे असे हे लिखाण आहे. 2004 पासून लेख, कविता, पुुस्तक परीक्षण इत्यादी लेखन केले आहे. सातारा आकाशवाणीवर वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम केले आहेत. विविध महिला मंडळांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.माझे पती विलास कदरकर, भाऊ संजय व संदीप, मुले विशाल, वैशाली यांनी माझा आत्मविश्वास वाढवण्यास मदत केल्याने हे शक्य झाले, असे त्या म्हणाल्या.

 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: