Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

ध्यानावस्था
ऐक्य समूह
Monday, December 23, 2013 AT 11:35 AM (IST)
Tags: vc1
सुरुवातीस ध्यानाची मुद्रावस्था निश्चित करून आपले डोळे बंद करा. त्यानंतर मनाने थोडावेळ गुरुमंत्राचा जप करा व ध्यान स्थिर करून जो अंधार दिसेल तो पहा. तो अंधार पहाणारे आमचे बाह्य नेत्र नसून अंतर्नेत्र म्हणजेच आत्मनेत्र असते. दिसणाऱ्या अंधाराच्या मध्यभागी पहावे. आम्हाला चश्रू गोलाच्या समोर पहावयाचे आहे. अगदी जमिनीच्या समांतर आठ, दहा  इंच अंतर राखून समोरासमोर वस्तु निरखून पाहतो. आम्ही आपले डोळे उर्ध्व करू नये. कारण त्यामुळे आमच्या डोळ्यांवर ताण येईल आणि आमचे डोके दुखू लागेल. अगदी आरामात झोपताना जसे डोळे बंद करता तसे करून आपल्यासमोर पहावयाचे आहे. सुरुवातीला अंधार दिसेल. परंतु आपण समोरच पहात राहिलो तर लाल, पिवळा, नारंगी, निळा, हिरवा, जांभळा अथवा सफेद किंवा सोनेरी रंगाचा प्रकाश दिसेल. आम्हाला अंतरी आकाश दिसेल. त्यात चांदण्या, चंद्र अथवा सूर्य पहावयास मिळतील. आम्हाला जे काही दिसेल त्याच्या मधोमध पहावे. शेवटी आम्ही अंतरीय आश्चर्य पहाण्यात मग्न होऊ म्हणजे आत्मा देहाभासाच्या वर जाऊ लागेल आणि तो अध्यात्मिक मंडळात उड्डाण करू लागेल. शब्द (श्रुती) वर ध्यान एकाग्र करण्याच्या अभ्यासाने आम्हाला अंतरकानाने अंतरीय नाद ऐकू येईल. ह्या शब्दधारा (नाद) परमेश्वरापासून येतात व शेवटी त्या आमच्या आत्म्याला दुसऱ्या जगात खेचून नेतात.
वेगवेगळ्या धर्मांमध्ये ध्यान साधनाचे संदर्भ :
ध्यान-साधनेच्या ह्या दुहेरी पध्दतीचा वेगवेगळ्या धर्मातील संत आणि महापुरुषांनी अभ्यास केला आहे. ज्योती आणि श्रुतीला वेगवेगळ्या भाषात आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या शब्दांनी संबोधले गेले आहे. म्हणून आम्ही या अभ्यासांना वेगवेगळे समजू शकतो. परंतु ह्यांचा मूळ सिध्दांत एकच आहे. उदा. बायबलमध्ये ज्योती आणि श्रुतीला "होली वर्ड' वा "शब्द' असे म्हटले आहे.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: