Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कल्याणी बॅरेक्स येथील वॉल कंपाऊंड हटवले
ऐक्य समूह
Wednesday, May 08, 2013 AT 11:04 AM (IST)
Tags: lo3
सातारा, दि.7 : सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा बॅंकेशेजारी असणाऱ्या परिसरातील इमारतींच्या कंपाऊंड वॉल जमिनदोस्त करण्यात आल्या.
कल्याणी बॅरेक्स येथे रस्ता रुंदीकरणास आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कंपाऊंड वॉल पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवल्या. ही कारवाई भाग निरीक्षक अनिल भोसले, सतीश साखरे, वसंत मोहिते, विश्वास गोसावी, प्रकाश शिर्के आणि कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, रविवार पेठेतील जुनी भाजी मंडई येथील अतिक्रमणे स्वत: काढून घेण्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सूचना केल्या आहेत.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: