Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तांबवेत आज उद्योगपती अविनाश भोसले यांचा सत्कार
ऐक्य समूह
Saturday, May 04, 2013 AT 11:25 AM (IST)
Tags: re5

पुण्यातील पायाभूत सेवा क्षेत्रात सिंहाचा वाटा असणारे अविनाश भोसले सध्या जगविख्यात उद्योगपती बनले आहेत. मूळचे तांबवे येथील असणारे आणि पुण्यामध्ये बांधकाम, हॉटेल व्यवसाय आणि पायाभूत सुविधा देऊन आपल्या कार्यकर्तृत्वातून वेगळा ठसा उमटवून त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. नम्र स्वभाव, विनयशीलता, आतिथ्यशीलता जपणाऱ्या भोसले साहेबांच्या माध्यमातून तांबवे गावामध्येही अनेक विकासात्मक कामे उभी राहिली आहेत.  त्यांचा आज तांबवे येथे सत्कार होत आहे. त्यानिमित्ताने...
कराड तालुक्यातील तांबवेतील भोसले कुटुंबीय पुण्यामध्ये स्थायीक झाले. 1979 मध्ये अविनाश भोसले यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. पुण्यातील कर्वे रस्ता परिसरात पहिल्यांदा प्रकल्पाची उभारणी केली. सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी केलेल्या दर्जेदार कामामुळे त्यांना 1982 पासून शासकीय कामांची कंत्राटे मिळू लागली. 1982 ते 86 दरम्यानचा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा ठरला. पण दिवसरात्र कष्ट सोसून  त्यांनी अथक परिश्रमातून त्यांनी नवनवीन कल्पना राबवून त्यातून मार्ग काढला. त्यामुळे कोथरुड परिसरात त्यांचे एक, दोन नव्हे तर तब्बल 25 प्रकल्प सुरु झाले. 1985 साली त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या रस्ता परिसरात त्यांनी व्यापारी संकुल उभारले. ही कामे पूर्ण करीत त्यांनी कामांची श्रृंखला कायम ठेवली. ही कामे होत असतानाच अविनाश भोसले हे नाव 1989 मध्ये प्रकाश झोकात आले. त्यासाली पुण्यातील नटराज थीएटरची जागा घेऊन त्या जागेवर संकुल बांधले. 1989 नंतर मात्र आर्थिक मंदी आल्याने अविनाश भोसले यांच्यासाठी तो बॅडपॅच ठरला. तब्बल चार वर्षांनतर 1993 ला ते त्यातून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी आजतागायत मागे वळून पाहिलेले नाही. 1986 पासून त्यांनी "अविनाश भोसले ग्रुप' (एबीआयएल) या नावाखाली पुन्हा शासकीय कामे घेण्यास सुरुवात केली. त्या माध्यमातून त्यांनी रस्ते, उड्डाणपूल, बोगद्यांच्या उभारणीत मोलाची कामगिरी केली. त्यामुळे त्या क्षेत्रात एबीआयएल हे नाव मानाने घेतले जाते. 2002 मध्ये त्यांनी हॉटेल उद्योगात पदार्पण केले. पुण्यातील "हॉटेल सन ऍण्ड सन्स' त्यांनी विकत घेतले. लवकरच ते मुंबई मध्ये "वेस्ट इन' आणि "शांगिमा इन' हे पंचतारांकीत हॉटेल सुरु करणार आहेत. पायभूत क्षेत्रात एबीआयएलची प्रमुख कामगिरी म्हणजे त्यांनी उभारलेली पाच धरणे ही आहे. त्याचबरोबर आसाम मध्ये एबीआयएल मार्फत जलविद्युत प्रकल्पही सुरु करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये 800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाचीही उभारणी सुरु होईल. पुण्यामध्ये सर्वाधिक उंच इमारत बांधण्याचा मानही एबीआयएल लाच आहे. या सर्व कामाबरोबर त्यांचा उर्जा व खाण उद्योगक्षेत्रात उतरण्याचाही एबीआयएलच्या माध्यमातून मानस आहे.
- अनिल पाटील, तांबवे.
 
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: