Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय कृषी सहसंचालकांकडून ऊस विकास योजनेेचे कौतुक
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:04 AM (IST)
Tags: news
कराड, दि. 27 : केंद्र पुरस्कृत ऊस विकास योजनेंतर्गत कराड तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या विविध ठिकाणच्या ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी केंद्रीय कृषी मंत्रालयातील केंद्रीय कृषी सहसंचालक विरेंद्र सिंह यांनी बुधवारी करुन योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल कौतुकही केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना काही मार्गदर्शक सूचनाही केल्या.
कराड तालुक्यात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यांच्या मार्फत महाराष्ट्र कृषी विभागाच्यावतीने केंद्र पुरस्कृत ऊस विकास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 75 टक्के व राज्य सरकारकडून 25 टक्के अर्थसाह्य केले जात आहे. या अनुदानाचा योग्य विनियोग होता का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी सहसंचालक विरेंद्र सिंह यांनी कराड तालुक्यातील ऊस प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करुन माहिती घेतली. त्यांनी पेरले गावातील 70 टक्के शेतकरी पाचट न पेटवता ती शेतातच कुजवत असल्याची माहिती घेवून त्यांनी येथील शेतकऱ्यांचे कौतुक केले. दिनेश दादासाहेब कदम यांच्या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रात्यक्षिक प्लॉट हे सर्वांना पाहण्यासाठी सोपे जावेत, याकरिता ते रस्त्याकडेला असावेत, अशी सूचना केली.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: