Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स. म. बेलोशे यांचे कार्य दीपस्तंभासारखे : आ. शिंदे
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:08 AM (IST)
Tags: news
भिलार, दि. 27 : जावली व महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षण, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात स. म. बेलोशे (गुरुजी) यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे असून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी युवकांनी त्यांच्या कामातून प्रेरणा घ्यावी. त्यांच्या चतुरस्त्र कामामुळे काटवली गावचा नावलौकिक वाढला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
काटवली, ता. जावली येथे स. म. बेलोशे (गुरुजी) यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी आ. शिंदे बोलत होते. यावेळी जावली-साताऱ्याचे आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे, बापुराव पार्टे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र राजपुरे, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर, उपाध्यक्ष दिलीप बगाडे, जावली बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव भिलारे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, साहेबराव बिरामणे, जगन्नाथ शिंदे, तुकाराम घाटगे, सुभाषराव फरांदे व मान्यवर उपस्थित होते.
आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, विशेषत: ग्रामीण भागात राहून स. म. बेलोशे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवताना क्रीडा क्षेत्राची बांधिलकी जपत राज्य पातळीवरील खेळाडूही तयार केले. तसेच सहकाराचा मंत्र जपत विविध संस्था उभ्या केल्या आणि आता विविध पदावर काम करत परिसराच्या विकासात मोलाचे असे भरीव कार्य केले आहे. त्यामुळेच की काय ते आजही राजकीय क्षेत्रातील शिलेदारांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा आदर्श सर्वांना स्फूर्तिदायी असा आहे. सत्काराला उत्तर देताना स. म. बेलोशे (गुरुजी) म्हणाले, कळंबे महाराज व भिलारे गुरुजी यांच्या सहवासात मी घडलो. एक शिक्षक म्हणून मी समाज घडवण्याचे काम करतानाच माझ्यावर आलेली प्रत्येक जबाबदारी इमाने इतबारे पार पाडत गेलो आणि त्यातूनच मी विविध क्षेत्रात यशस्वी होत गेलो. अर्थात यात आपल्या सर्वांचे विशेषत: काटवली गावचे सहकार्य होतेच. मी आतापर्यंतच्या कार्यात तृप्त आहे. यापुढेही मी सामाजिक बांधिलकी जपून सर्व क्षेत्रात काम करत राहिन. यावेळी स. म. बेलोशे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गणपत पार्टे, आबा मालुसरे, रमेश देवघरे, हणमंतराव पार्टे, प्रमोद शिंदे, नगरसेविका रेखा कांबळे, सुलभा लोखंडे, सुमन रांजणे, अंकुश शेडगे, अरविंद कळंबे, प्राचार्य अरुण गाडे, सा. मा. साळुंखे, सरपंच अमृत बेलोशे, हणमंतराव रांजणे, महादेव बेलोशे, बाबुराव रांजणे, रामदास रांजणे, गोपाळ बेलोशे, गावोगावचे सरपंच, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: