Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:52 AM (IST)
Tags: news
सातारा, दि.27 : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस, चेअरमन रवींद्र झुटिंग, व्हाईस चेअरमन सुरेखा रानडे, डॉ. संदीप श्रोत्री, ऍड. दत्तात्रय बनकर, लांगडे, अकबरभाई शेख, शशिभूषण जाधव, लालासाहेब बागवान, राजेंद्र नलवडे व देवधर यांच्या हस्ते झाले.
चिटणीस म्हणाले, संस्था नवनवीन उपक्रम राबवित आहे. संस्था लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संस्थेने दिनदर्शिका काढली आहे. या दिनदर्शिकेत संस्थेच्या विविध योजनांविषयी, संस्थेची वैशिष्ट्ये, संचालक मंडळाची यादी तसेच शाखांचे पत्ते देण्यात आले आहेत. संस्थेच्या एकूण ठेवी 15 कोटी असून कर्ज वाटप 11.5 कोटी आहे. तरलतेपोटी संस्थेने विविध बॅंकांमध्ये 3.5 कोटीची गुंतवणूक केली आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतिपथावर असून सामाजिक उपक्रमही राबवत आहे. संस्था पारंपरिक बॅंकिंग सेवेबरोबर व्यवसायाची कास धरुन ग्राहकांना अधिकाधिक सेवा देवून त्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सेवक व पिग्मी एजंट उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: