Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रविवारी देशभक्तिपर समूहगीत स्पर्धा
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:50 AM (IST)
Tags: news
सातारा,दि.27 : गीता परिवार, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 29 जानेवारी रोजी हॉटेल राधिका पॅलेस येथे दुपारी 4 वाजता "बाळ मी गायले देशासाठी' या समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इनरव्हीलच्या कोषाध्यक्षा सौ. गीता मामणिया  यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचा उद्देश लहान मुलांवर देशभक्तिपर गीतांचे संस्कार व्हावेत हा आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन माणदेशी महिला बॅंकेच्या अध्यक्षा सौ. चेतना सिन्हा यांचे हस्ते होणार आहे.स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाना 3 हजार,  2500,  2 हजार रुपये, चौथ्या क्रमांकास 1500, पाचव्या क्रमांकास 1000 रुपये, तर उत्तेजनार्थ 500 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना जिल्हा पोलीसप्रमुख के.एम. एम. प्रसन्ना यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस श्रध्दा लांडे, अमित कदम यांची उपस्थिती होती.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: