उज्वल यशासाठी विद्यार्थ्यांना मोकळीकही हवी : मदनराव मोहिते
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 01:01 AM (IST)
रेठरे बुद्रुक, दि. 27 : शिक्षणात विद्यार्थ्यांचा कल पाहून पालकांनी त्यांना बळ द्यावे. उज्वल यशासाठी मोकळीकही द्यावी, त्यामुळे यशस्वी विद्यार्थी घडतील, असे मत यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी व्यक्त केले.
जुळेवाडी, ता. कराड येथे विभागात पहिला सी. ए. झालेल्या प्रशांत गोंधळेकर याच्या आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी डॉ. अतुल भोसले, माजी जि.प. सदस्य दिलीप मंडले, माजी पं.स. सदस्य संजय पवार,
संयोजक राजेंद्र मोहिते, सरपंच डी. एस. सोमदे, उपसरपंच भरत बाकले, आबा मोहिते, शेरेचे सरपंच बाळासाहेब निकम, उपसरपंच मोहनराव निकम, डॉ. राजेंद्र पवार, खुबीचे उपसरपंच धनाजीराव माने, सुनील माने, संदीप माने, समीर पाटील, प्राचार्य एस. बी. भांबुर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.भोसले म्हणाले, परिसरातील मुले शिकली पाहिजेत, यादृष्टीने जयवंतराव भोसले यांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. विद्यार्थ्यांनीही या चळवळीस साथ दिली.
स्पर्धात्मक युगात महानगरांमधील मुलांशी ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा करावी लागणार आहे. त्यासाठी प्रशांत गोंधळेकरांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
राजेंद्र मोहिते, प्रशांत गोंधळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. आबा सूर्यवंशी यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
शिवाजी सावंत यांनी आभार मानले.
यावेळी वसंतराव काळे, माधव वेदपाठक, अशोक सोमदे, धनश्री शिंदे, शिवाजी पाटील तसेच विविध पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.