कराडात आढळले दुर्मीळ जातीचे उटमांजर
ऐक्य समूह
Saturday, January 28, 2012 AT 12:51 AM (IST)
कराड, दि. 27 : येथील कोळेकर हॉस्पिटलजवळील नारळाच्या झाडावर गुरुवारी सकाळी दुर्मीळ जातीचे उटमांजर आढळून आले.
त्यास वनविभागाने अग्निशामक दलाच्या मदतीने झाडावरुन काढून सुरक्षित स्थळी
सोडून दिले.
हे मांजर दुर्मीळ जातीमध्ये मोडते. रात्रीच्या वेळी सरडा, बेडके त्याचप्रमाणे पक्ष्यांचे ते भक्षण करते. नारळाच्या झाडावर एखाद्या खोवणीत झोपते. सकाळी हे मांजर दिसताच काही नागरिकांनी दगड मारण्यास सुरुवात केली.
ही बाब काही नागरिकांनी पक्षीमित्र रोहन भाटे यांना सांगितल्यावर त्यांनी अग्निशामक दलाच्या सहकार्याने त्या मांजरास झाडावरुन काढले. त्यानंतर या मांजरास वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी सोडून दिले.