गणेश जयंतीनिमित्त धुंडीविनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
ऐक्य समूह
Thursday, January 26, 2012 AT 02:28 AM (IST)
वाई, दि. 25 : श्री क्षेत्र वाईचे ग्रामदैवत श्री धुंडीविनायकाचा उत्सव गणेश जयंतीला विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
यावर्षी माघ शुक्ल 4 शके 1932 गुरूवार, दि. 26 जानेवारी रोजी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेत "श्रींच्या मूर्तीला अभिषेक, महापूजा, सकाळी 9 वा. गंगापुरी येथील सेवा भजनी मंडळाचे भजन, दुपारी 12 वा. गणेश जन्मकाळ, सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.