यमुनाबाई वाईकर, अनुप जलोटांना "पद्मश्री' तर भूपेन हजारिका, मारियो मिरांडांना "पद्मविभूषण'

नवी दिल्ली, दि. 25 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, भजन गायक अनुप जलोटा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या 109 सन्माननीय व्यक्तींना पद्मश्री, संगीतकार भूपेन हजारिका, व्यंगचित्रकार मारियो मिरांडा, माजी राज्यपाल टी. व्ही. राजेश्वर यांच्यासह पाच ख्यातनाम व्यक्तिमत्वांनापद्मविभूषण, अभिनेत्री शबाना आझमी, प्रसाद शेट्टी, माजी सतर्कता आयुक्त एन. विठ्ठल यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जाहीर करण्यात आले. पद्म पुरस्कार विजेत्यांची काही नावे पुढीलप्रमाणे :
पद्मविभूषण : के. जी. सुब्रह्मण्यम, मारियो मिरांडा, भूपेन हजारिका, कांतीलाल संचेती, टी. व्ही. राजेश्वर.
पद्मभूषण : शबाना आझमी, धर्मेंद्र, सत्यनारायण गोएंका, प्रा. शशिकुमार चित्रे, बालसुब्रह्मण्यम मुथुरमण, डॉ. सुरेश अडवाणी, डॉ. नोशीर एच. वाडिया, प्रा. शांताराम मुजूमदार.
पद्मश्री : यमुनाबाई वाईकर, वनराज भाटिया, जिया फरीद्दुदीन डागर, शाहिर परवेज खान, सतीश आळेकर, अनुप जलोटा, नीरज पांड्या, येजदी हिरजी मालेगम, अरुण फिरोदिया, स्वाती पिरामल, डॉ. मुकेश बत्रा, प्रभाकर वैद्य, के. पड्डाया.