Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दत्त जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम
ऐक्य समूह
Sunday, December 04, 2011 AT 02:32 AM (IST)
Tags: news


श्री दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे विविध कार्यक्रम
सातारा, दि. 3 : प. पू. श्री श्री श्री नारायण महाराज यांच्या अधिपत्याखाली श्री क्षेत्र नारायणपूर, ता. पुरंदर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त दि. 8 ते 10 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दत्त जयंती सोहळ्यात दि. 8 रोजी 200 कोटी शिव-दत्त नाम यज्ञ, अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंड, अकराव्या वर्धापनदिनानिमित्त सायंकाळी 4 ते 8.30 कार्यक्रम होणार आहे. दि. 9 रोजी येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत, सायंकाळी 7.03 वाजता दत्त जन्मसोहळा होणार असून दि. 10 रोजी दत्त जयंती सोहळा होणार आहे. या दत्त जयंती सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
करंजे येथील दत्त मंदिरात जयंती सोहळ्यास प्रारंभ
माहेश्वरमूर्ती महादेवप्रभू स्वामी यांच्या आशीर्वादाने करंजे येथील गुरूकृपा मंदिरात  दत्त जयंती सोहळ्यास  रूद्राभिषेक व महाआरतीने प्रारंभ झाला आहे. रविवार, दि. 3 रोजी दुपारी 3.30 ते 4.20 यावेळेत गुरूचरित्राच्या चौथ्या अध्यायाचे पठण, दुपारी 4.30 वाजता दत्तजन्म सोहळा व पुष्पवृष्टी, रविवार, दि. 11 रोजी सायंकाळी 7 ते 10 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दत्त जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भुजबळ, विद्याधर पंचपोर, किरण लखापती, दीपक भंडारे, अजित स्वामी प्रयत्नशील आहेत.
 आंधळी, दहिवडी-मलवडीत विविध कार्यक्रम
श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवारातर्फे अक्कलकोट स्वामी मंदिर, आंधळी, दहिवडी-मलवडी येथे दि. 4 ते 10 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.  या सोहळ्यात श्री स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांना अभिषेक, शंकराच्या पिंडीचे पूजन सकाळी 8 ते 10.30, स्वामी चरित्र वाचन सकाळी 9 ते 10.30, होमामध्ये आहुती देणे सकाळी 10.30 ते 11.30 व सायंकाळी 6.30 ते 7, स्वामी समर्थ व इतर देवतांना नैवेद्य-आरती दुपारी 12 ते 12.30, प्रसाद वाटप दुपारी 1 ते 3, आध्यात्मिक मार्गदर्शन रात्री 8 ते 8.30, नैवद्य व आरती रात्री 8.30 ते 9 वाजता होणार आहे. दि. 4 रोजी पू. ईश्वर बुवा रामदासी उर्फ दादा महाराज भाळवणी यांचे प्रवचन, दि. 5 रोजी सौ. प्राची व्यास यांचे कीर्तन, दि. 6 रोजी वे. भू. क्षीतिजल भोसले यांचे प्रवचन, दि. 7 रोजी ह. भ. प. आत्माराम महाराज नावडकर यांचे प्रवचन, दि. 8 रोजी शाहीर अण्णा रमजान बागणीकर यांचा शाहिरी कार्यक्रम. दि. 9 रोजी विलासराव शिंगटे यांचे प्रवचन, दि. 10 रोजी  मकरंद पुस्तिका व माणदेश भूषण  पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार असून दुुपारी 12.39 वाजता दत्त जन्मत्सोत्सव सोहळा होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सकाळी 10 ते 2 यावेळेत होणार आहेत.
श्री दत्त जयंतीनिमित्त दिंडोरीप्रणित उत्सव
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत  दि. 4 ते दि. 11 या कालावधीत श्री दत्त जयंती नामजप व श्री गुरूचरित्र पारायण सप्ताह सामुदायिक साजरा केला जाणार आहे. या उत्सवामध्ये श्री गुरूचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र, श्री दुर्गा सप्तशती, श्री. नवनाथ, श्री भागवत ग्रंथांची पारायणे, विविध याग, त्रिकाळ आरती, महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचार अभिषेक, वास्तू दोष, पितृ दोष यावर मोफत मार्गदर्शन, औदुंबर प्रदक्षणा, नित्यसेवा, जप इत्यादी. श्री सत्य दत्त पूजनाने व यज्ञ पूर्णाहुतीने सप्ताह सांगता प्रसाद वाटपाने होणार आहे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
तडवळे येथे धार्मिक कार्यक्रम
तडवळे, ता. खटाव येथे शनिवार, दि.10 रोजी  श्री दत्त जयंती सोहळा साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दलितमित्र जगन्नाथ फाळके (गुरूजी) यांनी दिली. शनिवार दि.10 रोजी सायंकाळी 7 ते 9 तडवळे गावातून श्रींची भव्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीदरम्यान ढोल, गजी खेळ व दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक होणार आहे. रात्री 9 वाजता ह. भ. प. शिवाजी पवार महाराज यांचे कीर्तन होणार आहे. याच दरम्यान तडवळे परिसरातील विविध भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी तडवळे परिसरातील भाविकांनी या दत्त जयंतीनिमित्त होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान फाळके गुरूजी यांनी केले आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: