Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वैभव पुरस्काराचे आज फलटण येथे वितरण
ऐक्य समूह
Friday, October 14, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: *

फलटण, दि. 13 : फलटण लायन्स क्लब आणि प्रिंट व्ह्यू फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा वैभव पुरस्कार यावर्षी आयुर्वेदाचार्य डॉ. बालजी तांबे यांना जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 14 रोजी दुपारी 3.30 वाजता सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रिंट व्ह्यूच्या सौ. विजया पराडकर यांनी सांगितले.
15 हजार 1 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदाचे 12 वे वर्षे आहे. गेल्या 11 वर्षात या पुरस्काराने अभिनेते रमेश देव, मोहन आगाशे, विक्रम गोखले, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुलकर्णी, पं.प्रभाकर जोग, पं. पंढरीनाथ
कोल्हापुरे, ऍड. भास्करराव आव्हाड, डॉ. रमेश धोपटे, रमाकांत पाटील आणि डॉ. विजया वाड यांना सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमात डॉ. बालाजी तांबे हे सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमातच प्राचार्य डॉ. सौ. सुनंदा गोसावी, प्राचार्य डॉ. डी. एम. मुळे, प्राचार्य सौ. सुषमा निळे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
 यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य विश्वासराव देशमुख, डॉ. एम. एस. गोसावी, डॉ. सौ. वीणा तांबे, लायन्स क्लबचे अध्यक्ष जगजीवन गरवालिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: