Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली "कृष्णा'चा लौकिक वाढेल : पाटील
ऐक्य समूह
Friday, January 07, 2011 AT 12:22 AM (IST)
Tags: news


कराड, दि. 6 : "कृष्णा' सहकारी साखर कारखाना आशिया खंडातील मोठा साखर कारखाना आहे.  कारखान्याची सभासदसंख्या जास्त असताना देखील चेअरमन अविनाश मोहिते यांनी सभासदांसाठी 2 रुपयाने साखर देऊन त्यांना सन्मानाची वागणूक देत नवीन पायंडा पाडला आहे. संचालक मंडळ नवीन असताना देखील कारखाना चांगला चालविला जात असून कारखाना प्रगतिपथावर राहण्यासाठी सभासद व कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळास सहकार्य करावे. अविनाशदादांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक कृष्णा कारखान्यास नावलौकिक प्राप्त करुन देतील, असे प्रतिपादन राजारामबापू दूध संघाचे चेअरमननेताजीराव पाटील यांनी केले.
शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2010-11 सालातील गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 3 लाख 33 हजार 333 व्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळासाहेब लाड, महानंद दूध संघाचे चेअरमन विनायक पाटील, सांगली जिल्हा परिषद सदस्य लिंबाजी पाटील या मान्यवरांच्या हस्ते पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी  कारखान्याचे चेअरमन अविनाशदादा मोहिते, व्हाईस चेअरमन सुरेश पाटील, माजी संचालक सर्जेराव निकम, कापूसखेडचे जयकर पाटील, ताकारीचे सरपंच पाटील व मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांसमोर सध्या खाजगी कारखान्यांचे आव्हान आहे. सहकारी कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असल्याने तो चांगला चालवण्यासाठी सभासदांनी आपला ऊस आपल्याच मालकीच्या कारखान्यास पाठवावा. कृष्णा कारखान्यावर प्रथमच सभासदांना सन्मानाची वागणूक देवून त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम केले जात आहे. अविनाशदादांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कारखाना चांगला रितीने चालवित आहेत.
लाड म्हणाले, साखर कारखान्यांसमोरऊस तोडणी यंत्रणेची समस्या आहे. अपुरी ऊस तोडणी यंत्रणा असल्याने अविनाशदादांनी सर्व शेतकी कर्मचाऱ्यांना अनेक बैठका घेऊन योग्य तोडगा काढला आणि कारखान्यावर पूर्णक्षमतेने ऊस गाळप सुरु केले आहे. संचालकांनी ऊस तोडी नियमाने देण्यासाठी प्रयत्न करावेत. सभासद हिताला व सभासदाला सन्मानाची, आपुलकीची वागणूक  संचालक मंडळाकडून दिली जात आहे. कारखाना ज्या पद्धतीने सुरु आहे, हे पाहिल्यास सभासद हिताला प्राधान्य देणाऱ्या संचालक मंडळाला कोणीही दूर करू शकणार नाही.
अविनाश मोहिते म्हणाले, संचालक मंडळ नवीन असताना सर्व कामगारांनी जे सहकार्य केले. त्यामुळेचकारखाना पूर्णक्षमतेने चालविण्यास व नावलौकिक प्राप्त करण्यास मोठा हातभार लागला. सभासदांनी कोणी काय सांगेल, त्याकडे लक्ष देऊ नये. संचालक मंडळाने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. सभासदांच्या हिताला प्राधान्य देवून कठीण परिस्थितीत देखील कृष्णाचा गाळपात, उत्पादनात व रिकव्हरीत वरचा नंबर आहे.
यावेळी लिंबाजी पाटील, सर्जेराव निकम यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. मनोहर मोहिते यांनी सूत्रसंचलन केले. अमोल गुरव यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक पोपटराव जाधव, पांडुरंग पाटील, अशोक जगताप, सर्जेराव लोकरे, वसंत साळुंखे, बाळासाहेब निकम, पांडुरंग मोहिते, संभाजी दमामे, माधवराव पाटील, उदयसिंह शिंदे, महिंद्र मोहिते, डॉ. निवास पवार, संदीप पाटील, नितीन खरात, कामगार सोसायटीचे चेअरमन मोहन पवार, एम. के. कापूरकर यांच्यासह सर्व खाते व विभागप्रमुख, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: