Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"हरित किवळ ग्राम'चा उपक्रम कौतुकास्पद
ऐक्य समूह
Tuesday, October 19, 2010 AT 10:39 PM (IST)
Tags: news

मसूर, दि. 19 ः किवळ, ता. कराड येथील संत नावजीनाथ व जोतीर्लिंग जीर्णोध्दार समितीच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या "हरित किवळ ग्राम'चा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुंबई विभागाचे उत्पादन शुल्क उपाआयुक्त तानाजीराव साळुंखे यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगीता साळुंखे यांनी केले. जीर्णोध्दार समितीच्यावतीने संपूर्ण किवळ गाव परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला असून शेतकऱ्यांना आंबा, चिक्कू, नारळ, पेरू, रामफळ आदी फळझाडांची 1111 रोपे वाटण्यात आली आहेत. प्रत्येकाने या रोपांचे स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करावे व निर्सगाचा समतोल राखून वृक्षवल्ली वाढवावी, असे आहवानही सौ. साळुंखे यांनी केले. तसेच शासनाच्या वृक्षलागवडीच्या उपक्रमास महिलांनीही सहकार्य करावे असे सांगून "तळसी ' या वृक्षाचे महत्व सांगितले. आर. पी. साळुंखे म्हणाले, किवळ हरितग्राम उपक्रम यशस्वी करण्यासाठी समितीला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास माजी डी. वाय. एस. पी. उत्तमराव साळुंखे, माजी पंचायत समितीचे सदस्य डॉ. विजय साळुंखे, रामचंद्र साळुंखे तसेच विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: